सागर भंडारे

मी सागर भंडारे, रा. वडु बु . ता. शिरूर, जि . पुणे , दिनांक ३१-१०-२०२० रोजी के. ई .एम हॉस्पिटलच्या वडुबुद्रुक येथील आरोग्य शिबिरामध्ये माझे आजोबा श्री. गेनबा दिनकर सातव यांना तपासणीसाठी घेऊन गेलो असता, सदर तपासणीमध्ये डॉ. नाईक यांनी ऑपेरेशनचा योग्य सल्ला व मार्गदर्शन केले व सोमवार दिनांक ३-११-२०२० रोजी के. ई .एम पुणे इथे ऍडमिट केले. ४ नोव्हेंबर रोजी सर्व तपासण्या फ्री ऑफ चार्ज करून ऑपेरेशन करण्यात आले व दिनांक ७ नोव्हेंबर रोजी डिस्चार्ज देण्यात आला. सदर सर्व प्रक्रियेमध्ये डॉ. नाईक सर व डॉ. प्रांजल मॅडम आणि विशेषतः पूजा पवार मॅडम यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले याबद्दल मी सर्वांचे विशेष आभार व्यक्त करतो. अशा प्रकारचा उपक्रम आपण भविष्यामध्ये हे राबवावा अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद!!

सागर भंडारे